दोन विभागातील एक महिला व एक पुरुष कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा हादरले. आज सकाळी तातडीने दोन्ही विभागांचे सॅनिटायझेशन करण्यात आल्याचे समजते.
महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोन्ही विभागांचे सॅनिटायझेशन करण्यात आले. सध्या कमीत कमी कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरू आहे. मात्र महसूल, सामान्य प्रशासन आवक-जावक यासह अनेक विभागात अत्यावश्यक सेवेसाठी कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती असते. कर्मचाऱ्यांना सुरक्षित अंतर राखूनच कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक कर्मचारी कॉम्प्युटर,खुर्ची, टेबल सकाळीच सॅनि टाईझ करीत असतात. तरीही दोन विभागातील एक पुरुष आणि एक महिला पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दोन्ही विभागांचे संपूर्ण सॅनिटायझेशन करण्यात आले.











